.

abc

abc

तंत्रस्नेही समूह कुही नागपूर वर आपले प्रदीप मोहोड कडून स्वागत या संकेत स्थळाच्या माध्यमातून तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्वाची माहिती आपणास माहिती असावी व तंत्रज्ञानाच अध्ययन अध्यापनात वापर वाढवा हा महत्वपूर्ण उद्देश आहे .ब्लोगवरील काही माहिती संकलनात्मक आहे .

.. .

Tuesday 7 August 2018

नमस्कार मित्रांनो आज आपल्याला तंत्रस्नेही समूह नागपूर च्या माध्यमातून परिपाठा मध्ये
उपयुक्त ठरणारे गीते ,प्रार्थना,समूह गीत या ब्लॉग वर उपयुक्त करून देण्यात येत आहे.हे सर्व संकलन आहे फक्त आपल्याला उपलब्ध व्हावे एवढाच प्रामाणिक उद्देश ठेऊन हि पोस्ट आपणा पुठे सादर करत आहे.



PRARTHANA GITE

15 ऑगस्ट गीत

उपयुक्त गीते



Sunday 1 October 2017




WEL COME


महात्मा गांधी जयंती निमित्य सर्वांचे स्वागत.


स्वच्छ भारत अभियान




                                                                    मोहनदास करमचंद गांधी


 (ऑक्टोबर २इ.स. १८६९ - जानेवारी ३०इ.स. १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजीनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यानी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते.संदर्भ हवा ] नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये त्यांना प्रथम राष्ट्रपिता असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांची जयंती भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते.
असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकर्‍यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली. गांधीजी आजीवन साम्प्रदायीकातावादा (सम्प्रदायांवर राजकारण करणे) चे विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचले. ढासळत जाणार्‍या खिलाफत चळवळीला त्यानी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे नेते बनले.१९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४०० कि.मी. (२५० मैल) लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले. १९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले. या आणि यासारख्या इतर कारणांसाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले.
गांधीजींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा यांचा पुरस्कार केला, स्वतःही याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले. त्यानी खेड्यांना खर्‍या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. ब्रिटनमधील विसटर्न चर्चिल याने त्यांची "अर्धनग्न फकीर" म्हणून निर्भत्सना केली. स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राहणी होती. त्यांनी शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा आत्मशुद्धीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले.
ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी १९३० साली, गांधीजींची "अर्धनग्न फकीर" म्हणून कुचेष्टा केली होती. (It is alarming and also nauseating to see Mr. Gandhi, a seditious Middle Temple lawyer of the type well-known in the East, now posing as a fakir, striding half naked up the steps of the Viceregal palace to parley on equal terms with the representative of the King-Emperor.) त्यांच्या शेवटच्या वर्षांमध्ये भारत पाकिस्तान फाळणीमुळे व्यथित झालेल्या गांधीजीनी हिंदू मुस्लीम दंगे थांबवण्यासाठी प्रयत्‍न केले.
२ ऑक्टोबर हा दिवस भारतात गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' म्हणून पाळला जातो.
गांधींचे तत्त्वज्ञान निव्वळ पुस्तकी नव्हते तर ते उपयोगितावादात्मक (प्राप्त परिस्थितीत स्वतःच्या तत्त्वांचे आचरण करणारे) होते.


जन्म:
मृत्यू:
चळवळ:भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना:अखिल भारतीय काँग्रेस
पुरस्कार:टाईम साप्ताहिक-वर्षातील प्रसिद्ध व्यक्ती
प्रमुख स्मारके:राजघाट
धर्म:हिंदू
प्रभाव:
पत्नी:कस्तुरबा गांधी
अपत्ये:

Thursday 27 July 2017

मेल

⚜⚜⚜Ⓜ🅰🅿⚜⚜⚜
🙏🏼🙏🏼  
                    *मेल*
इ-मेल किवा इलेक्ट्रानिक्स मेल म्हणजे इलेक्ट्रानिक्स मसेज होय. ग्राफिक्स , फोटो , विडियो किवा फाइल , डाटा या ईमेल मधून सहज जगात कुठे ही एका मिनिटा मध्ये जावू शकतो . आपण ईमेल च्या माध्यमातून आपल्या प्रियजन व्यक्तिना किवा अजुन कुणाला ही मेल पाठवू शकतो . ज्या प्रमाने आपण मोबाइल मध्ये SmS करतो त्याच प्रमाने ईमेल असते .एकच ईमेल बर्याच व्यक्तिना पाठवू शकतो शिवाय बर्याच लोकाना ईमेल करताना त्याना कळाले नाही पाहिजे की आपण कुणा कुणाला ईमेल पाठवले आजे तर ते ही BCC ह्या आप्शन मध्ये सर्व व्यकतिंची नावे म्हणजेच एड्रेस टाइप करावा नॉर्मली आपन ईमेल पाठवण्या साठी To या आप्शन मध्ये सर्वांची नावे टाइप करतो . या साठी आपणास एक ईमेल अकाउंट उघडावे लागेत आणि पीसी इंटरनेटशी जोडलेला असला पाहिजे . सध्या याहू , जीमेल , Aol किवा rediffmail अशी बरीच डोमिन आहेत की जे फ्री अकाउंट उघडण्यासाठी परमिशन देतात .
ईमेल मध्ये ३ बाबी महत्वाच्या असतात .


१) एड्रेस :- यात आपण कोणाला मसेज पठावत आहे त्याचा ईमेल आय .डी. असतो ज़र ईमेल आयडी चुकला तर मसेज जात नाही . थोडक्यात ज्याला आपण मेसेज करणार आहोत त्याचे नाव व्यवस्तित असणे गरजेच असत उदा.pappumohod1984@gmail.co


२) सब्जेक्ट :- यात आपण जे आपणास समोरील व्यक्तिना संदेश द्यायचा आहे तो लिहावा लागतो .हा संदेश ग्राफिक्स , फोटो , विडियो किवा फाइल , डाटा या सुरुपाचा असतो.


३)अटैचमेंट :- म्हणजे आपण आपल्या ईमेल बरोबर पठावणारी फाइल होय . ती आपणास ईमेल बरोबर जोड़ने आवशक असते . बरच वेळेस फाइल न जोड़ता आपण ईमेल समोरील व्यक्तिना पाठवतो त्या मुळे अटैचमेंट ईमेल ला जोड़नेआवशक असते . जॉब साठी आपला बायो डाटा आपण ईमेल ला अटैचमेंट मध्ये जोडून समोरील व्यकतिला पाठवतो . अटैचमेंट ग्राफिक्स , फोटो , विडियो किवा फाइल , डाटा या स्वरूपात असते .
*संकलन :-प्रदीप मोहोड कुही नागपूर*
www.zpschoolrajola.blogspot.com
9⃣8⃣6⃣0⃣7⃣4⃣9⃣0⃣2⃣7⃣
⚜⚜⚜Ⓜ🅰🅿⚜⚜⚜

Sunday 11 June 2017

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र गुणदान निकष नुसार 

25 मुद्दे - निकष आणि गुण

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत प्रगत शाळा घोषित करण्यासाठी आवश्यक २५ निकष
खालील निकषांपैकी प्रत्येक निकष पूर्ण असेल तरच १०० % गुण मिळतील आणि तीच शाळा प्रगत समजली जाईल.
 प्रगत शाळा निकष आणि गुण
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
१) पट आणि वर्षभराची सरासरी उपस्थिती (५ गुण)
२) शाळाबाह्य बालके आणि प्रत्यक्ष प्रवेशीत बालके (५ गुण)
३) शाळा परिसर अगदी स्वच्छ असल्यास (५ गुण)
४) प्रत्येक विषयासाठी ज्ञानरचनावादी साहित्य किमान
१० घटकावर आधारित २० प्रकारचे साहित्य शिक्षकांनी स्वनिर्मित असल्यास (५ गुण)
५) कोणतयाही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास किमान ५ गणिती संख्या वाचता लिहता येणे.ई.१ली साठी २ अंकी आणि त्यापुढील इयत्तासाठी १ अंक वाढवत जाणे. (५ गुण)
६) कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक बेरीज करता येणे. (५ गुण)
७) कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक वजाबाकी करता येणे. (५ गुण)
८) कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक गुणाकार करता येणे. (५ गुण)
९) कोणत्याही वर्गातील कोणत्याही किंवा सर्व विद्यार्थ्यास शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने किमान एक भागाकार करता येणे. (५ गुण)
१०) वजन/मापे/आकारमान/लांबी/वेळ यावर  उदाहरणे सोडवता येणे (५ गुण)
११) प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप किमान ५ वाक्ये वाचता येणे .(५ गुण)
१२) प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास त्या इयत्तनुरूप किमान ५ वाक्ये श्रुतलेखनाने लिहता येणे .(५ गुण)
१३) वर्गानुकूल आशयाच्या अकलनावर कोणत्याही विद्यार्थ्यास ५ प्रश्नांची उत्तरे देता येणे.(५ गुण)
१४) प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास एक शब्द दिल्यानंतर त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून पाठपुस्तकाबाहेरील किमान ५ शब्द तयार करता येणे. (५ गुण)
१५) कोणत्याही विद्यार्थ्यास पथ्यपुस्तकातील कोणतीही कविता साभिनय सादर करता येणे.(५ गुण)
१६) कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास चित्रवाचन करता येणे.(५ गुण)
१७) कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ शब्द दिल्यास किमान ५ वाक्ये तयार करता येणे.(५ गुण)
१८) कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ सोपे शब्द दिल्यास त्यापासून गोष्ट तयार करता येणे.(५ गुण)
१९) मुलांच्या चेहऱ्यावर , बोलण्यात, उत्तरे देण्यात कमालीचा आत्मविश्वास दिसून येतो.(५ गुण)
२०) प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यास किंवा सर्व विद्यार्थास एक छोटी नाटिका सादर करता येणे.(५ गुण)
२१) प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यास घड्याळाची काटे फिरवून अचूक वेळ सांगता येणे.(५ बोनस गुण)
२२) कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ३ सोपे शब्द दिल्यास त्यापासून कहोती कविता तयार करता येणे.(५ बोनस गुण)
२३) कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल ५ इंग्रजी प्रश्नांची उत्तरे देता येणे. (५ बोनस गुण)
२४) कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल एका वस्तूचे चित्र रेखाटता येणे. (५ बोनस गुण)
२५) कोणत्याही वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास वर्गानुकूल दआलेल्या विषयावर स्वतःचे मत मांडता येणे. (५ बोनस गुण)
                      सर्व २५ निकषांच्या आधारावर किमान ८० गुण मिळाल्यास आणि संकलित २ च्या चाचणीत प्रत्येक विद्यार्थ्यास किमान ६० % गुण मिळाल्यास ती शाळा प्रगत घोषित करण्यात येईल.
नवीन अपडेट   
    

शाळासिद्धी - शाळेत ठेवायचे रेकॉर्ड

शालासिद्धी ज्या शाळा अ श्रेणीत आल्या आहेत त्यांच्या साठी शाळेत संकलित करायच्या महत्वाच्या बाबी.



क्षेत्र -१

शाळेचे सामर्थ्य स्त्रोत

१ शासन आदेश अ )-राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा. ब)शिक्षण हक्क अधिनियम २००९ . क )स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय परिपत्रक .
२ शालेय आवार मैदानाची अधिकृतरीत्या नोंदणी ,उपलब्ध खेळाच्या मैदानाची नोंद .
३ शाळेत करण्यात आलेली दुरुस्ती /देखभाल नोंद.
४ क्रीड्डान्गन मापे ,उपलब्ध साहित्याची यादी .
५ ग्रंथालय देवघेव रजिस्टर ,उपलब्ध पुस्तकाची यादी ,साठा नोंद वही .
६ किचनमध्ये उपलब्ध भांडे व साहित्याची यादी .
७ वर्गणी लावलेली वृतपत्रे,मासिके,नियतकालिके,इ पुस्तके यादी.
८ विद्युत उपकरणाची यादी,प्रथोमपचार साहित्य यादी .
९ नळाच्या तोट्याजवळ हात धुण्यासाठी साबणाची उपलब्धतता .
१० मागील वर्षी घेतलेल्या सांस्कृतिक /क्रीडास्पर्धा नोंदी.
११ पाणी तपासणी अहवाल ,शुद्धीकरणा साठी केलेली कृती .
१२ शाळा विकासासाठी मागणी केलेल्या अनुदानाची/प्रस्तावाची नोंद.


क्षेत्र -२

अध्यन व अध्यापन व मूल्यमापन
१ विध्यार्थी संचिका .
२ CCA नोंदवही व अभिलेखे व निकालपत्रके .
३ पालक भेट ,गृहभेटी ,नोंदवही .
४ इयत्तावार व विषयवार शैक्षणिक साहित्य यादी.
५ ज्ञानरचनावद साहित्य यादी,डिजिटल साहित्य यादी .
६ वर्षभरात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाची यादी .
७ वर्षभरात प्राविण्य मिळवलेल्या स्पर्धांची मीहिती .
८ वार्षिक, मासिक , घटक नियोजन ,ताचन वही .
९ वर्ग व्यवस्थापन,गणित पेटी,विज्ञान पेटी.
१० सूचना वही ,शिक्षक लोग्बूक ,अभिप्राय रजिस्टर .
११ स्काउट गाईड ,मीना-राजू मंच स्थापना रजिस्टर .
१२ सहशालेय व इत्तर कार्यक्रम फोटो .
१३ विध्यार्थी हजेरी .

क्षेत्र -३

विध्यार्थी प्रगती संपादुणूक आणि विकास


१ परिसर भेट ,स्पर्धा फोटो.
२ वर्ग अध्यापण नियोजन .
३ विधार्थी हजेरी .
४ पटनोंदणी रजिस्टर ,शाळा बाह्य मुले सर्वेक्षण रजिस्टर.
५ परिपाठ नियोजन रजिस्टर
६ शिक्षक पालक ,मत पालक ,मंत्रिमंडळ रजिस्टर .
७ सह शालेय उपक्रम रजिस्टर .
८ विध्यार्थी प्रगती विषयी असलेल्या नोंदी.
९ पायाभूत चाचणी ,आकारिक चाचणी,संकलित चाचणी सर्व अभिलेखे.


क्षेत्र -४

शिक्षकांची कामगिरी आणि व्यावसायिक विकासाचे व्यवस्थापन


१ मुख्यध्यापक व शिक्षकांनी वर्षभरात करावयाची कामे रजिस्टर.
२ शाळेत राबविल्या जाणाऱ्या योजनांची महिती रजिस्टर.
३ नवीन शिक्षकांसाठी केलेल्या उदबोधनाचा तपशील .
४ किरकोळ रजा रजिस्टर .
५ अनुपस्थित शिक्षकांच्या वर्गाची पर्यायी व्यवस्था रजिस्टर .
६ शिक्षकांनी सेवेत प्राप्त केलेल्या पात्रतेची नोंद रजिस्टर .
७ वर्ग शिक्षकांनी वर्गासाठी वर्षभरासाठी केलेले नियोजन रजिस्टर.
८ शिक्षकांचे लोग्बूक रजिस्टर .
९ शाळा विकास आराखडा U-DISE FORM
१० शिक्षकांचे प्रशिक्षण नोंद रजिस्टर.
११ सर्व शिक्षक स्वयं मूल्यमापन अहवाल .
११ पाठ्यक्रम पूर्ण करण्यासाठी केलेले नियोजन .
१२ शिक्षकांसाठी घेतलेले चर्चा सत्र ,परिसंवाद,काय्शाला,शैक्षणिक अभ्यासदौरा रजिस्टर.

क्षेत्र -५
शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन
१ शाळेचे घोषवाक्य /हेतू प्रदर्शित केलेले .
२ शाळा विकास आराखडा प्रत .
३ शाळा व्यवस्थापन रजिस्टर.
४ शिक्षक पालक,माता पालक,विशाखा समिती,शालेय परिवहन समिती रजिस्टर.
५ काम वाटणी रजिस्टर .


क्षेत्र -६
समावेशान आरोग्य आणि संरक्षण
१ पटनोंदणी ,वयाचे दाखले रजिस्टर .
२ शालाबाह्य मुले सर्वे रजिस्टर.
३ विशेष गरजा असनाऱ्या मुलांची वैक्तिक माहिती रजिस्टर ,त्यांच्यासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती.
४ विशेष बालकांना मिळालेल्या साहित्याची नोंद रजिस्टर .
५ विशेष बालकांच्या मदतनीसाना मिळालालेला भत्ता ,वाहन भत्ता रजिस्टर.
६ विशेष शिक्षकाकडून केलेले मार्गदर्शन ,अध्यापन रजिस्टर.
७ तक्रार पेटी ,सूचना पेटी.
८ शालेय आवारात आपत्ती व्यवस्थापन बाबत चित्ररूप माहिती , उदा ..अग्निशामक यंत्र.
९ आरोग्य तपासणी रजिस्टर .
१० तंबाखूमुक्त शाळा ,व होणार्या परिणामाची माहिती बोर्ड .
११ दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न रजिस्टर.
१२ आरोग्यसेविका ,अंगणवाडी सेविका,महिला दक्षता समिती,यांच्या मार्गदर्शनाखाली मुलीना केलेले मार्गदर्शन रजिस्टर.
१३ समुपदेशन वर्गाचे आयोजन व अहवाल.
१४ विध्यार्थ्यासाठी वैयक्तिक आरोग्य व स्वछता यासाठी केलेले उपक्रम रजिस्टर.

क्षेत्र -७
उत्पादक समाजाचा सहभाग
१ शाळा व्यवस्थापन समिती प्रोसेडिंग ,अजेंडा .
२ शाळा विकास आराखडा भरताना समितीची भूमिका अहवाल.
३ समाज सहभागातून केलेल्या कामाची नोंद रजिस्टर .
४ लोकसहभागाचे फोटो .
५ सामाजिक संस्था भेटी फोटो अहवाल,
६ शाळा प्र्वेशोत्सव फोटो अहवाल ,फोटो .
७ एक दिवस शाळेसाठी गावाचा उपक्रम फोटो .

*वरील रेकॉर्डची पाहणी होणार आहे त्यादृष्टीने तयारी कराव*